|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » Top News » नाशिकमध्ये बस आणि क्रुझर अपघात : 5ठार, 6जखमी

नाशिकमध्ये बस आणि क्रुझर अपघात : 5ठार, 6जखमी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

नाशिकमध्ये महामार्गावर असलेल्या शिरवडे फाटा या ठिकाणी बस आणि क्रुझरचा अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार तर 6 जण जखमी झाले आहेत अशी माहिती समोर येते आहे. जखमींवर जवळच्याच खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपळगाव चांदवडजवळ हा अपघात झाला.

या अपघातामुळे दोन्ही दिशेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. क्रूझर गाडी बागलाण तालुक्मयातील किकवारी येथील होती यामधले बसलेले सगळे जण एका लग्नासाठी जात होते त्याचवेळी हा अपघात झाला.चांदवडच्या खडकजांब गावाच्या शिवारातील प्रुझर मुंबई आग्रा महामार्गाने नाशिकच्या दिशेने जात होती. तेव्हा प्रुझरचे टायर फुटले. टायर फुटल्यावर ही गाडी दुभाजक ओलांडून नाशिकहून येणाऱया सटाणा आगाराच्या बस क्रमांक एम एच 14 बीटी 4716 ला धडकली. या धडकेत प्रुझरमध्ये बसलेल्या 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तर अपघातामुळे 6 जण जखमी झाले आहेत.

 

 

 

 

 

 

Related posts: