|Sunday, August 25, 2019
You are here: Home » विविधा » हातात साप घेऊन पठ्ठय़ा रूग्णालयात

हातात साप घेऊन पठ्ठय़ा रूग्णालयात 

ऑनलाईन टीम / बीड :

साप चालवल्यानंतरतरूणाने सापासह रूग्णालये गाठल्याची घटना बीडमध्येघडली आहे. लखन गायकवाड असे या तरूणाचे नाव असून एका हातात साप तर दुसऱया हाताला सलाईन अशा परस्थितीत लाखन रूग्णालयातील बेडवर उपचार घेत होता.

बीड जिल्हा रूग्णालयात सकाळी 9.30वाजण्याच्या सुमारास लखन गायकवाड हा तरूण साप चावला म्हणून स्वतः चालत रूग्णालयात दाखल झाला. यावेळी त्याच्या हातात पाच ते सहा फूट लांबीचा साप होता. हातातील साप पाहून सुरूवातीला डॉक्टरही घाबरले.मात्र लखनला उपचराची गरज असल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी तात्काळ त्याच्यावर उपचार सुरू केले.

एका हातात साप व दुसऱया हाताला सलाईन असे चित्र पहायला मिळाले. लखनच्या हातातला साप कोणी हातात घ्यायचा, असा प्रश्न उपस्थित झाला. त्याच वेळी सर्प मित्र व पोलिस असलेले अमित मगर यांना फोन करुन बोलावून घेतले गेले. बीड जिल्हा रूग्णालयात अपघात कक्षात लखन यांच्यावर उपचार सुरु आहेत. सर्प मित्र मगर हे रुग्णालयात आल्यानंतर लखनच्या हातातून साप काढून घेण्यात आला. अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ लखनने हातात साप घेऊन उपचार घेतले.