|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मंगळवेढय़ातील बनावट दूध केंद्रावर छापे

मंगळवेढय़ातील बनावट दूध केंद्रावर छापे 

प्रतिनिधी/ सोलापूर

मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी येथील सुमित मिल्क ऍन्ड  प्रॉडक्ट्स  व मे हॅटसन ऍग्रो प्रॉडक्टस् तसेच ज्योतिर्लिंग सहकारी दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने टाकण्यात आलेल्या छाप्यात 2 हजार 400 लिटर  भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले तर भेसळयुक्त दुधासाठी वापरण्यात येणारे 975 किलो पावडर जप्त करण्यात आली आहे. या कारवाईने तालुक्यातील दूध संकलन केंद चालवणाऱयांचे धाबे दणाणले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने यावेळी दूध संकलन केंद्र तसेच केंद्राचे मालक यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले. यात विश्लेषणासाठी काही दूध घेऊन उर्वरित भेसळयुक्त दूध व पावडर नष्ट करण्यात आली. कारवाईनंतर दोन्ही दूध संकलन केद्राचा परवाना रद्द करण्याबाबतच्या सुचना संबंधितांना करण्यात आल्या आहेत. तसेच दोन्ही दूध संकलन केंद्राचा परवानाही रद्द करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे समजते.

     या कारवाईत कोल्हापूर विभागाचे ए. बी. कोळी, आर. पी.पाटील, विजय उणवणे, सांगली जिह्याचे सतीश हाके, सोलापूर जिल्हय़ाचे योगेश देशमुख, मंगेश लवटे तर पुणे जिल्हय़ातील उल्हास इंगवले आदींनी भाग घेतला होता.

 

  परवानगीविना चालत होते हॅटसन दूध केंद्र

   चौकशीवेळी मे. हॅटसन दूध संकलन केंद्रास परवानगी नसल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या छाप्यावेळी आढळून आले. या कारवाईत भेसळीसाठी वापरण्यात आलेली व्हे परमिट पावडर 273 किलो, लॅक्टोस पावडर 198 किलो जप्त करण्यात आली. पथकाने तिन्ही दूध संकलन केंदावरुन सुमारे लाखांचा साठा जप्त केला आहे.