|Saturday, March 23, 2019
You are here: Home » Top News » पुणे पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटील

पुणे पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटील 

ऑनलाईन टीम / पुणे  :

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सार्वमत-देशदूतचे मुख्य प्रतिनिधी राजेंद्र पाटील यांची रविवारी निवड झाली. तर सरचिटणीसपदी पुढारीचे पांडरंग सांडभोर व खजिनदारपदी सामनाचे ब्रिजमोहन पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत.

उपाध्यक्षपदी सकाळचे विश्वजित पवार व महाराष्ट्र टाईम्सचे रोहित आठवले, तर चिटणीसपदी सकाळच्या मीनाक्षी गुरव व दिनमानचे विजय जगताप यांची निवड झाली. कार्यकारिणी सदस्यपदी मटाचे प्रशांत आहेर, टीव्ही 9चे सागर आव्हाड, चंद्रकांत हंचाटे, पुण्यनगरीचे मंगेश पवार, लोकमतचे युगंधर ताजणे यांच्यासह दहा जणांची बिनविरोध निवड झाली आहे.

 

 

Related posts: