|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बेळगाव येथील स्केटींग स्पर्धेत ओमकारेश्वरी व समर्थ यांचे यश

बेळगाव येथील स्केटींग स्पर्धेत ओमकारेश्वरी व समर्थ यांचे यश 

कोल्हापूर

बेळगाव येथे नुकत्याच शिवगंगा रोलर स्केटीं क्लबच्यावतीने घेण्यात आलेल्या स्केटींग स्पर्धेत सेंट झेव्हीयर्स प्री प्रायमरी स्कूलच्या ओमकारेश्वरी धैर्यशील जाधव व समर्थ धैर्यशील जाधव या दोघा भाऊ-बहिणीने पदकाची भरघोस कमाई केली.

ओमकारेश्वरीने 8 ते 10 वर्षांआतील इनलाईन स्केटींग प्रकारात 300, 500, 700 व रिले या प्रकारात 4 सुवर्णपदकांची कमाई केली. तर समर्थने 6 वर्षे वयोगटातील कॉड स्केटींग प्रकारात 300, 500 मीटरमध्ये दोन सुवर्णपदके मिळविली.

या दोघांनी बेळगाव येथे सलग 72 तास रिले स्केटींग करण्याचा विश्वविक्रमही केला असून, याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, येशीया बुक ऑफ रेकॉर्ड, चिल्ड्रन बुक ऑफ रेकॉर्ड, बेस्ट इंडिया, इंडिया ऍच्युवर बुक ऑफ रेकॉर्ड, नॅशनल रेकॉर्ड, येशिया रेकॉर्ड या बुकमध्ये नोंद झाली आहे.

या त्यांच्या कामगीरीबद्दल स्कूलच्यावतीने त्या दोघांचा सत्कार प्रिन्सीपल फादर जेम्स थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होता. हे दोघही सेंटझेव्हीयर्स स्केटींग ऍकॅडमीमध्ये सराव करत आहेत. त्यांना प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय स्केटींग प्रशिक्षक प्रा. महेश कदम, क्रीडा शिक्षक किरण साळोखे, अल्ताप कुरेशी  यांचे मार्गदर्शन लाभले