|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » इचलकरंजीत आज श्री राधाकृष्ण मंदिरच्या प्राण प्रतिष्ठा

इचलकरंजीत आज श्री राधाकृष्ण मंदिरच्या प्राण प्रतिष्ठा 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

येथील लक्ष्मी व्यंकटेशनगरमध्ये उभारण्यात आलेल्या श्री राधाकृष्ण मंदिरच्या प्राण प्रतिष्ठा महोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला. आचार्य श्री कृष्णानंदजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू असून सोमवारी (ता.25) मंदिरात मुर्तीची प्राणप्रतिष्ठा महोत्सव होणार आहे. ही माहिती संयोजक नितीन धूत यांनी दिली.

 येथील जुन्या चंदूर रोडवर लक्ष्मी व्यंकटेशनगरमध्ये नव्याने मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात मुर्ती प्राण प्रतिष्ठा महोत्सव होत आहे. यानिमित्त शनिवारी (ता.23) रात्री 9 पासून सुंदरकांड़ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी आचार्यश्री कृष्णानंदजी महाराज यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले, जीवनात पद, प्रतिष्ठा, यश, किर्ती या सर्वापक्षा ईश्वर समर्पण सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्यामध्येच अंतिम सुरण आहे. राधा व कृष्ण हे वेगळे नसून एकच आहेत. आणि त्यामुळे त्यांना वेगळे मानणे हे चुकीचे आहे. धर्माचे मुख्य स्थान भागवत कथा असून त्यात जीवनाचे सार दडले आहे.’ सोमवारी सकाळी 9 वाजता भव्य कलश व शोभा यात्रा हनुमान मंदिर आवाडेनगर येथून निघणार आहे. सकाळी सव्वा अकरा वाजता भगवान मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. दुपारी साडेतीन ते सहा या वेळेत आचार्यश्री कृष्णानंदजी महाराज यांचे श्रीकृष्ण लीला व भगवत कथासार यावर कथेचा समारोप कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजक भवंरलाल, मनोजकुमार, नितीन, राजगोपाल, डॉ. कृष्णकुमार धूत परिवार हे आहेत. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक महावीर गाट, सतीश ड़ाया, संजय कांबळे, अनिल स्वामी, युवराज माळी, गणेश भदरगड़े, लक्ष्मीकांत पटेल, फिरोज शिरगावे, सुनिल बोरा, अतुल बावणे, मयूर शहा आणि लक्ष्मी व्यंकटेशनगरमधील नागरिकांच्यावतीने करण्यात आले आहे.

 

Related posts: