|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » निवडणुकीपूर्वी भाजपा जातीय दंगली घडविण्याची शक्यता : रविकांत तुपकर

निवडणुकीपूर्वी भाजपा जातीय दंगली घडविण्याची शक्यता : रविकांत तुपकर 

प्रतिनिधी/ सांगोला

देशात सध्या सत्तेवर असणारे भाजप सरकार मोठय़ा प्रमाणावर फसवे निघाले असुन, सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांपूर्वी भाजपा देशात जातीय दंगली घडविण्याची शक्यता असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

   रविवार 24 रोजी मिरज रोडवरील स्वाभिमानी भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, तालुकाध्यक्ष आबासो शेळके, प्रा. संजय देशमुख, पंढरपुर तालुकाध्यक्ष नवनाथ माने, पंढरपुर युवा तालुकाध्यक्ष सचिन पाटील, मध्यप्रदेशचे सोनुभाई पाटीदार, महिला आघाडी नेत्या विश्रांती भुसनर, पांडुरंग खटकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

  तुपकर म्हणाले, सध्याच्या भाजप सरकारने शेतकऱयांची घोर फसवणूक केली असुन, ऊस व दुधाला हमीभाव देण्यास अपयशी ठरले आहे. यावर्षी उसउत्पादकाला त्यांची बिले मिळाली नाहीत. त्यामुळे त्यांना पीककर्ज घेता आले नाही. त्यामुळे सरकार फसवे निघाले आहे. शेतकऱयांच्या पत्नीला बंकेत कर्ज मागण्यासाठी गेले असता, तिला अधिकाऱयांकडून शरीरसुखाची मागणी केली जाते ही सरकारच्या दृष्टीने अत्यंत लाजीरवाणी बाब असुन, पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. यावरुन भाजप सरकारचे प्रशासनावर नियंत्रण राहिले नसल्याचे दिसुन येत आहे. तसेच भाजपच्या राज्यात शेतकऱयांबरोबर नोकरदाराचीही अवस्था फार बिकट असल्याचे त्यांनी सांगितले.

  भाजप सरकारने केलेली नोटाबंदी ही काळा पैसा बाहेर आणण्यासाठी नव्हती तर तो एक भाजपचा पैसा कमाविण्याचा धंदा होता. असा आरोप करीत अमित शहांच्या बंकेत जमा झालेली रक्कम याचे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच प्रशासकीय सेवेत सरळ भरती करुन आपल्या विश्वासातील कार्यकर्त्यांची वर्णी लावून संविधानालाच आव्हान देण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे सांगितले.

  येत्या लोकसभेसाठी स्वाभिमानी सज्ज असुन राज्यातील सहा मतदार संघात आपले उमेदवार उभे करणार असल्याचे सांगुन सोलापुर जिह्यातील माढा लोकसभा मतदार संघात आमचाच खासदार होणार असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

पत्री सरकारच्या धर्तीवर किसान आर्मी
  क्रांतीसिंह नाना पाटील यांनी पत्रीसरकारची स्थापना करुन इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते. त्यांच धर्तीवर शेतकऱयांच्या संरक्षणासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ‘किसान पुत्र आर्मी’ ची स्थापना करण्यात येणार असुन, त्यामाध्यमातून शेतकऱयांच्या दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Related posts: