|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » वाजपेयींच्या तब्येतीच्या चौकशीसाठी सुरक्षेविनाच मोदी ‘एम्स’मध्ये

वाजपेयींच्या तब्येतीच्या चौकशीसाठी सुरक्षेविनाच मोदी ‘एम्स’मध्ये 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रात्री माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल झाले. विशेष म्हणजे यावेळी पंतप्रधान मोदी हे सुरक्षेविनाच रूग्णालयात गेले होते.

किंबहुना, मोदी एम्समध्ये पोहोचल्यानंतर रुग्णालय प्रशासनाला ते आल्याचे कळले. रुग्णालय प्रशासनालाही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती.पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळपास 45 मिनिटं एम्समध्ये होते. तिथे त्यांनी डॉक्टरांकडून वाजपेयींच्या तब्येतीची माहिती घेतली.दोन दिवसांपूर्वी वाजपेयींना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र आता त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

93  वर्षीय अटल बिहारी वाजपेयी 11 जून 2018 रोजी उपचारासाठी एम्समध्ये दाखल झाले आहेत. किडनीच्या आजारामुळे त्यांनी एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. वाजपेयी 2009 सालापासूनच आजारी आहेत. त्यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हिलचेअरचा वापर करावा लागतो. अटल बिहारी वाजपेयी हे डिमेंशिया आजाराने त्रस्त आहेत.