|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » मुंबईत पाणी तुंबले नाही : महापौर महाडेश्वरांचा दावा

मुंबईत पाणी तुंबले नाही : महापौर महाडेश्वरांचा दावा 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्यानंतर आता भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. ’करुन दाखवलं’ म्हणणाऱयांनी ’पळून दाखवलं’ असं म्हणत भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला, मात्र महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना मुंबईत पाणी तुंबल्याचंच दिसत नाही.

 

पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबलं आहे. त्यामुळे मतदार शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केंद्रापर्यंत पोहचू शकलेले नाहीत. यावरुन आशिष शेलारांनी शिवसेनेवर टीका केली. मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱयांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही. ’करुन दाखवलं’ म्हणणाऱयांनी पावसानंतर ’पळून दाखवलं’ अशा शब्दात शेलारांनी शिवसेनेला लक्ष्य केलं.