|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » उद्योग » आयडिया-व्होडाफोन विलिनीकरणास विलंब

आयडिया-व्होडाफोन विलिनीकरणास विलंब 

दूरसंचारकडून 4,700 कोटींची मागणी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील दूरसंचार क्षेत्रातील सर्वात मोठय़ा कंपन्या म्हणून आयडिया आणि व्होडाफोन यांना ओळखण्यात येते. या दोन कंपन्या एकत्रित होणार असून त्यासाठी करण्यात येणारा व्यवहार काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. हा व्यवहार करण्यासाठी दूरसंचार विभागाने व्होडाफोन कंपनीकडे 4 हजार 700 कोटीच्या शुल्काची मागणी केल्याने हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता अधिकाऱयांनी व्यक्त केली.

दोन्ही कंपन्यांमध्ये 30 जूनपर्यंत व्यवहार करण्यात येणार असल्याचाही अंदाज बांधण्यात येत आहे. परंतु दूरसंचार विभागाच्या हस्तक्षेपामुळे याला आणखीन उशीर लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अगोदर 2015 साली व्होडाफोनकडून व्होडाफोन ईस्ट, साऊथ व्होडाफोन सेल्युलर आणि व्होडाफोन डिजिलिंक यांच्या मोबाईल सेवांचे विलिनीकरण करण्यात आले होते. त्याला आता व्होडाफोन इंडिया या नावानी ओळखण्यात येते. या विलीनकरणाकडे उद्योग जगताचे बारकाईने लक्ष होते.