|Sunday, May 26, 2019
You are here: Home » Top News » आणीबाणीचा विरोध करणाऱयांना सलाम, संविधनाला कोणीही हात लावू शकत नाही : मोदी

आणीबाणीचा विरोध करणाऱयांना सलाम, संविधनाला कोणीही हात लावू शकत नाही : मोदी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

43 वर्षांपूर्वी इंदिरा गांधींनी देशात पहिल्यांदा आणीबाणी लागू केली होती. 25 आणि 26 जूनच्या मध्यरात्री तत्कालीन राष्ट्रपती फखरूद्दीन अली अहमद यांच्या स्वाक्षरीनंतर देशात पहिल्यांदा आणीबाणी लागू झाली. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी ट्विटरद्वो एकामागोमाग तीन ट्विट रून आणीबाणीविरोधात लढणाऱयांना सलाम ठोकला आहे. तसेच कोणतीही शक्ती आपल्या संविधानाच्या मुलभूत सिद्धांतावर घाला घालू शकत नाही अशी ग्वाही मोदींनी दिली.

पंतप्रधान मोदींनी पहिल्या ट्वटिमध्ये आणीबाणीचा विरोध कऱणाऱयांना सलाम ठोकला. 43 वर्षांपूर्वी लादलेल्या आणीबाणीचा ज्या महिला-पुरूषांनी विरोध केला त्यांच्या साहसाला मी सलाम ठोकतो.दुसऱया ट्वटिमध्ये त्यांनी आणीबाणीचा दिवस काळा दिवस होता असं म्हटलंय ,या दरम्यान प्रत्येक संस्थेवर दबाव होता आणि भीतीचं वातावरण होतं, असं त्यांनी म्हटले.

 

 

 

Related posts: