|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Automobiles » मारुतीची ७ सीटर ‘वॅगन आर’ लवकरच होणार लॉन्च

मारुतीची ७ सीटर ‘वॅगन आर’ लवकरच होणार लॉन्च 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मारुती सुझुकीची सर्वात लोकप्रिय ‘वॅगन-आर’ नव्या स्वरुपात भारतात दाखल होतेय. नवी ‘वॅगन-आर’ जुन्या वॅगन-आरच्या मॉडेलपासून बरीच वेगळी आहे. यामध्ये अगोदरपेक्षा जास्त स्पेस आणि दमदार इंजिन असेल.

‘वॅगन-आर’चं ७ सीटर मॉडेल यावर्षी सणासुदीच्या काळात म्हणजेच ऑगस्टमध्ये लॉन्च केलं जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. सध्याच्या ‘वॅगन-आर’मध्ये केवळ ५ जणांना बसण्यासाठी व्यवस्था आहे. नव्या ‘वॅगन-आर’मध्ये १.२ लीटरचं ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन ८४ bhpच्या पॉवरसोबत ११५nm टॉर्क जनरेट करतं. ५ स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (AMT) दोन्ही ऑप्शन्समध्ये ही कार बाजारात उपलब्ध असेल. कंपनी नव्या ‘वॅगन-आर’सोबत सीएनजी ऑप्शन देण्याचाही विचार करू शकते. 

‘वॅगन-आर’ ३ वेरिएंटमध्ये लॉन्च होऊ शकते. या कारचे तीन वेरिएंट R बेस, R टॉप आणि R सीएनजी असू शकतात.

या कारची सुरुवातीची किंमत ५.२ लाख रुपये असू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये R बेसची एक्स शोरुम किंमत ५.२ लाख रुपये, R टॉपची ६.५ लाख आणि R सीएनजीची किंमत ६.३ लाख रुपये असू शकेल.

Related posts: