|Thursday, August 22, 2019
You are here: Home » उद्योग » जिओनी करणार भारतातील व्यवसायाची विक्री

जिओनी करणार भारतातील व्यवसायाची विक्री 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जिओनी या चिनी स्मार्टफोन कंपनीकडून भारतातील आपला व्यवसाय विक्री करण्यात येणार आहे. जिओनी इंडियाचे माजी सीईओ आणि समभागधारक अरविंद आर. व्होरा, कार्बन मोबाईल कंपनीचे प्रवर्तक हा व्यवसाय खरेदी करतील. चीनमध्ये कंपनीकडे रोख रकमेची कमतरता भासत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

भारतीय खरेदीदारांकडे जिओनी ब्रॅन्डचा वापर करण्यासाठी 10 वर्षांची मुदत देण्यात आली. ते बॅन्ड लायसन्सव्यतिरिक्त जिओनी इंडियामधील 74 टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी जिओनीला देयक, आणि रॉयल्टी देतील. हा व्यवहार 200 ते 250 कोटी रुपयांना होण्याची शक्यता असून यापैकी 125 कोटी रुपयांचा ब्रॅन्ड लायनन्ससाठी देण्यात येतील. जिओनी इंडियातील चिनी व्यवस्थापक मायदेशी परतणार आहेत. ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱया हंगामापूर्वी ब्रॅन्ड सुधारित करण्यात येईल आणि कमी किमतीतील स्मार्टफोन बाजारात उतरत शाओमीबरोबर स्पर्धा करण्यात येईल.

भारतातील व्यवसाय वाढीसाठी कंपनीकडून विराट कोहली, आलिया भट्ट आणि श्रृती हासन यांची सदिच्छादूतपदी नियुक्ती केली होती आणि आपल्या फोनमधील सेल्फी फोटोग्राफीला प्रमोट केले होते. मात्र चीनमध्ये कंपनीला वित्तीय संकटांचा सामना करावा लागत आहे. चीनच्या न्यायालयाने अध्यक्ष आणि सीईओ लियू लिरोंग यांच्याकडील 41.4 टक्के हिस्सा दोन वर्षांसाठी स्थगित केला आहे. जिओनी 2012 मध्ये भारतात प्रवेश केला असून 42 हजार दुकाने, 600 सेवा केंद्रे असून 1.25 कोटी स्मार्टफोन वापरकर्ते आहेत. आंध्रप्रदेशात कंपनीचा प्रकल्प आहे.