|Sunday, August 25, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » चेन्नईच्या विद्यार्थ्यांनी तयार केला सर्वात हलका उपग्रह

चेन्नईच्या विद्यार्थ्यांनी तयार केला सर्वात हलका उपग्रह 

चेन्नई

 चेन्नई येथील हिंदुस्तान इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्समधील एअरोस्पेस विभागाच्या विद्यार्थ्यांनी जगातील सर्वात कमी वजनाचा उपग्रह तयार केला आहे. या उपग्रहाचे वजन केवळ 33.39 ग्रॅम आहे. जयहिंद 1 एस असे नाव असलेल्या या उपग्रहाकरता केवळ 15 हजार रुपयांचा खर्च आला. 3डी प्रिंटेड पीएलए नायलॉनने तयार झालेल्या उपग्रहाला तीन प्रयोगांसाठी निर्मिण्यात आले आहे.सुक्ष्म गुरुत्वाकर्षणात नायलॉनच्या कार्यशीलतेची तपासणी करणे याचा मुख्य उद्देश आहे. याचबरोबर हवामानाच्या माहितीसाठीचा याचा वापर केला जाईल. उपग्रहाद्वारे तापमान, दबाव, घनत्व, अतिनील किरणांच्या तीव्रतेबद्दल माहिती मिळू शकते. उपग्रह 15 ते 20 तासांपर्यंत काम करणार आहे. अंतराळातील वातावरणात 65 ते 70 किलोमीटरपर्यंतचा प्रवास तो करू शकतो असा दावा विद्यार्थ्यांनी केला. ऑगस्ट महिन्यात अमेरिकेच्या कोलेरेडो अंतराळ केंद्रातून याचे प्रक्षेपण होईल.