|Friday, March 22, 2019
You are here: Home » Top News » मराठा आरक्षणाबाबत आयोगाने कामाची गती वाढवावी : हायकोर्ट

मराठा आरक्षणाबाबत आयोगाने कामाची गती वाढवावी : हायकोर्ट 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी कामाची गती वाढवा आणि येत्या 14 ऑगस्टला होणाऱया सुनावणीत आजवरच्या कामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करा,’ असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला दिले.

 

मराठा विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला जावा, अशी मागणी एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या मागास प्रवर्ग आयोगाकडं प्रलंबित आहे. मात्र, आयोगानं यावर अद्याप कसलीही ठोस कार्यवाही केलेली नाही. याकडं याचिकेद्वारे लक्ष वेधण्यात आलं होतं. न्यायमूर्ती रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी खंडपीठानं आयोगाला कामाचा वेग वाढवण्याचे आदेश दिले. या कामासाठी सप्टेंबर अखेरपर्यंतची मुदत द्यावी, अशी विनंती सरकारनं केली होती. मात्र, न्यायालयानं त्यास नकार देत आयोगाला जुलैची मुदत दिली.

 

Related posts: