|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » डीएसके प्रकरण : महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱयांना जामीन

डीएसके प्रकरण : महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱयांना जामीन 

ऑनलाईन टीम / पुणे :

डीएसके यांना नियमबाह्य कर्ज दिल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता, माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत, विभगीय व्यव्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांना शुक्रवारी जामीन मंजूर करण्यात आला.

विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्या खंडपीठानं हा आदेश दिला. या तिघांना जामीन देण्यास सरकारी वकिलांनी गुरुवारी हरकत घेतली होती. मात्र, पोलिसांनी त्यांना जामीन द्यावा असा लेखी अर्ज दिला. गुप्ता, मुहनोत, देशपांडे यांना जामीन मंजूर करण्यात यावा, असा अर्ज बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांनी सादर केला होता. अ‍ॅड. निंबाळकर यांना अ‍ॅड. सचिन ठोंबरे, शैलेश म्हस्के, अ‍ॅड. ॠषी घोरपडे यांनी सहाय्य केले. तर, सुनील घाटपांडे यांच्यातर्फे अ‍ॅड. एस. के. जैन यांनी जामीन अर्ज सादर केला. नेवासकर यांच्यातर्फे अ‍ॅड. रोहन नहार यांनी जामीन अर्ज सादर केला आहे.