|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » वसईत चिंचोटी धबधब्यावर पिकनिकला गेलेल्या तरूणाचा बुडून म़ृत्यू

वसईत चिंचोटी धबधब्यावर पिकनिकला गेलेल्या तरूणाचा बुडून म़ृत्यू 

ऑनलाईन टीम / वसई :

पावसळय़ात धबधब्यांचा आनंद लुटताना दाखवलेली निष्काळजी तरूणाच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. वसईतील चिंचोटी धबधब्यावर 18 वर्षांच्या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

सुनीलकुमार हरिशचंद्र गुप्ताचा मृत्यू झाला असून तो मुंबईतील कांदिवलीमध्ये ठाकूल व्हिलेज परिसरातील राहत होता. सुनीलकुमार शुक्रवारी आपल्या सात मिंत्रासोबत वसईतील चिंचोटी धबधब्यावर पिकनिकसाठी आला होता.गुपसोबत पाहत असताना वाहत्या धबधब्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला होता. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सुनीलकुमारचा मृतदेह शोधला.याबाबत वालीव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यानिमित्ताने पावसाचा आनंद लुटनाता जीवाची काळजी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.