|Saturday, March 23, 2019
You are here: Home » Top News » म्हाडाची सोडत जाहीर

म्हाडाची सोडत जाहीर 

 पुणे / प्रतिनिधी :

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे, सातारा, कोल्हापूर व सोलापूर जिह्यातील सदनिका व भूखंडाची संगणकीय सोडत शनिवारी पुण्यातील नांदेड सिटी येथे जाहीर झाली.

  अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी 3 हजार 139 सदनिका, तर 29 भूखंडांच्या विक्रीसाठी ही सोडत काढण्यात आली. सकाळी 10 वाजता म्हाडाचे सभापती समरजितसिंह घाटगे, सचिव भारत बास्टेवाड, उपसचिव रामचंद्र धनावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय लहाने, आमदार भीमराव तापकीर यांच्या उपस्थितीत या सोडतीला सुरुवात झाली. म्हाडाच्या सदनिका आणि भूखंडाच्या सोडतीसाठी एकूण 36 हजार 99 अर्ज आले होते. त्यापैकी 3168 लोकांना या सोडतीचा लाभ झाला. सोडतीसाठी स्त्राr सदस्य देखरेख समिती नेमण्यात आली होती.

 समरजितसिंह घाटगे म्हणाले, या सोडतीसाठी आयआयटी पवईकडून संगणकीय प्रणाली तयार करून घेण्यात आली आहे. तसेच राज्याचे माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिवांच्या मार्गदर्शनाखाली सोडतीची तयारी करण्यात आली. पूर्णपणे ऑनलाईन सोडत असल्याने कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ओव्हर साईट कमिटीचे सदस्य सुरेश कुमार व एन आय सीचे माईज हुसेन यांच्या देखरेखीखाली या सोडतीचे कामकाज झाले. http://lottery.mhada.gov.in/ या संकेतस्थळावर यासंदर्भातील माहिती मिळेल, असे घाटगे यांनी यावेळी सांगितले.

Related posts: