|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » उपनिबंधक प्रकाश अष्टेकरांचा जिल्हा सहकारी बँकेतर्फे सत्कार

उपनिबंधक प्रकाश अष्टेकरांचा जिल्हा सहकारी बँकेतर्फे सत्कार 

प्रतिनिधी/ सातारा

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा या पदावर रूजू झालेले प्रकाश अष्टेकर यांचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व आमदार शिवेंद्रराजे भोसले तसेच सभापती व संचालक रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, बँकेच्या संचालक मंडळाने लोकाभिमुख निर्णय घेवून अनेक विकास योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. बँकेस नाबार्ड तसेच राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कारांनी गौरविले असून आयएसओ 9001 : 2008 हे बँकींग सेवा क्षेत्रातील मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये ही ‘सहकार क्षेत्रातील सर्वोच्च बँक’ म्हणून नोंद झाली आहे.  स्थापनेपासून ऑडिट ‘अ’ वर्ग प्राप्त झालेला आहे. बँकेचे ढोबळ एन. पी. ए.चे प्रमाण 0.29 टक्के व निव्वळ एन. पी.ए प्रमाण ‘शून्य’ टक्के आहे. त्याचबरोबर  जिह्यातील सहकारी संस्थांची मातृसंस्था म्हणून बँक 272 शाखा व 46 विस्तारीत कक्षांच्या माध्यमातून कार्यरत आहे. 

प्रकाश अष्टेकर म्हणाले, सातारा जिल्हा बँकेच्या सर्वकष कामकाजाची माहिती घेतली असून बँक राबवित असलेल्या विविध योजना या प्रभावशाली आहेत. बँकेचे कामकाज उत्कृष्ट असून इतर सहकारी बँकिंग क्षेत्राला आदर्शवत असेच आहे. या बँकेस भविष्यकाळात कामकाजास नेहमीच सहकार्य राहील, असे आवर्जुन सांगितले.  

या कार्यक्रमास बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, संचालक विलासराव पाटील-उंडाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, दादाराजे खर्डेकर, दत्तानाना ढमाळ, प्रकाश बडेकर, राजेंद्र राजपुरे, प्रदीप विधाते, कांचनताई साळुंखे, बँकेचे सरव्यवस्थापक संजयकुमार जाधव, मधुकर जाधव यांच्यासह विविध विभागांचे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सेवक वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होते.