|Sunday, November 18, 2018
You are here: Home » Top News » टूरिस्ट गाईडचा इटालियन पर्यटक महिलेवर बलात्कार

टूरिस्ट गाईडचा इटालियन पर्यटक महिलेवर बलात्कार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

स्वतःल टूरिस्ट गाईड म्हणवून घेणाऱया व्यक्तीने परदेशी पर्यटक महिलेवर बलात्कार केला.37वर्षीय इटालियन पर्यटक महिलेवर या व्यक्तीने बलात्कार केला.

इटालियन पर्यटक 11 जून रोजी बांळुरूहून मुंबई दर्शन करण्यासठी आली होती. त्यानंतर 14 जून रोजी गेट वे इंडिया बघून आल्यानंतर मुंबई दर्शन करण्यासाठी टॅक्सी,बस शोधात असतना स्वतःला गाईड म्हणवून घेणाऱया व्यक्तीच्या ती संपर्कात आली. संपूर्ण मुंबई दर्शन करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीने घेतली. मात्र , त्याच दिवशी रात्री साडे आठच्या सुमारास त्या व्यक्तीने टॅक्सी बूक करून ती टॅक्स जुहूजवळ एका वाईन शॉपजवळ थांबवली.त्या महिलेला जबरदस्ती करून तिच्यावर अतिप्रसंग केल्याचे महिलेने तिच्या तक्रारीत सांगितले आहे. त्यानंतर त्या महिलेने या व्यक्तीपासून आपली सुटका करून दक्षिण मुंबईतील आपले हॉटेल गाठले आणि दुसऱया दिवशी मुंबईहून बंगळुरूला राहत असलेल्या आश्रमात गेली.

 

Related posts: