|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आशियाई स्पर्धेसाठी भारताचा फुटबॉल संघ नाही

आशियाई स्पर्धेसाठी भारताचा फुटबॉल संघ नाही 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इंडोनेशियातील जकार्ता येथे ऑगस्ट महिन्यात होणाऱया आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा फुटबॉल संघ पाठविला जाणार नाही. तथापि अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने भारतीय ऑलिंपिक संघटनेवर दूरदृष्टीच्या अभावाबद्दल जोरदार टीका केली आहे.

सध्या रशियामध्ये फिफाची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा सुरू असून यामध्ये आशियाई खंडातील पाच अव्वल संघांचा समावेश आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तुलनेत फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा दर्जा अधिकच वरचढ आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघाच्या प्रवेशासाठी भारतीय ऑलिंपिक संघटनेचे प्रमुख नरेंद्र बात्रा यांचे प्रयत्न अपुरे ठरल्याने भारतीय फुटबॉल फेडरेशनने त्यांच्यावर टीका केली आहे. 1994 च्या हिरोशिमा (जपान) येथे झालेल्या आशियाई स्पर्धेनंतर यावेळी पहिल्यांदाच भारतीय फुटबॉल संघ जकार्तामध्ये दिसणार नाही. आंतरखंडीय स्तरावरील मानांकनात 1 ते 8 क्रमांकावरील संघांना आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याची नियमावली आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने तयार केली असल्याने भारतीय फुटबॉल संघाला जकार्ता आशियाई स्पर्धेला मुकावे लागत आहे. आशिया विभागात भारत सध्या 14 व्या स्थानावर आहे.

Related posts: