|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अजिंक्यतारा रस्त्यासाठी दीड कोटी रुपये मंजूर

अजिंक्यतारा रस्त्यासाठी दीड कोटी रुपये मंजूर 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहरालगत दिमाखात गेली अनेक तप उभ्या असणाऱया अजिक्यताऱयाच्या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. सातारकर दररोज सकाळ-संध्याकाळ त्या रस्त्याने ये-जा करतात. पर्यटकांची बसही रस्ता नसल्याने दरीत कोसळली होती. त्या घटनेनंतर सातारकरांनी अजिंक्यताऱयाच्या रस्त्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. ‘तरुण भारत’नेही याबाबत आवाज उठवला होता. नुकतीच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातून या रस्त्याच्या कामासाठी 1 कोटी 42 लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे. कामाच्या निविदा लवकरच निघणार आहेत. हे काम आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले, असा दावा नविआचे नगरसेवक शेखर मोरे, पंचायत समितीचे सभापती आशुतोष चव्हाण यांनी केला आहे.

अजिंक्यतारा किल्ला विकासाच्या बाबतीत अजूनही वंचितच राहिला आहे. अजिंक्यतारा किल्ल्याच्या दरवाजापर्यंत जाण्यासाठी असलेला रस्ता अत्यंत अरुंद आहे. हा रस्ता मुळात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे आहे. परंतु तरीही पालिका पदाधिकाऱयांवर या रस्त्यामुळे अनेक टीका सहन कराव्या लागत आहेत. गेल्या आठ दिवसांपूर्वीच या रस्त्याच्या कामासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून तब्बल 1 कोटी 42 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची खात्रीशीर माहिती आहे. त्या कामासाठी अभियंतेही निश्चित केले असून सर्व प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये त्याच कामासाठी निविदा प्रक्रिया मागवण्यात येणार आहे. त्यामुळे हे काम लवकरच होणार असल्याचे सांगण्यात येते. हे काम गोडोली येथील अजिंक्यतारा कमान येथून ते अजिंक्यताऱयाच्या मंदिरापर्यंत असल्याचे समजते.

आमदार गटाचे पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण आणि नविआचे नगरसेवक शेखर मोरे- पाटील यांनी हे काम आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या फंडातून करण्यात येत आहे. त्यांनी वारंवार पाठपुरावा करुन हे काम मंजूर केले आहे. लवकरच या कामासही प्रारंभ होईल. जिल्हा परिषदेनेही चांगला अभियंता दिला आहे, असा दावा केला आहे.

Related posts: