|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » मुंबईत कचऱयाच्या ट्रकखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू

मुंबईत कचऱयाच्या ट्रकखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / मुंबई  :                                                  

मुंबईत कचऱयाच्या ट्रकखाली चिरडून तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला. मोहम्मद गौस दस्थगीर अहमद असा या मुलाचे नाव आहे.गोवंडीतील शिवाजीनगर भागात ही घटना घडली.

शिवाजीनगरच्या प्लॉट क्रमांक 28 आणि 29च्या मध्ये असलेल्या रस्ते क्रमांक 4वर इथे आपल्या घरातून तो बहिणीसोबत बाहेर आला आणि अचानक समोरून येणाऱया कचऱयाच्या ट्रकखाली चिरडला गेला.स्थानिकांनी त्याला राजवाडी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.