|Monday, November 19, 2018
You are here: Home » Top News » मनसेच्या आंदोलनाविरोधात थिएटर मालकांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

मनसेच्या आंदोलनाविरोधात थिएटर मालकांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभरातील मल्टीप्लेक्स थिएटर विरोधात सुरू केलेल्या आंदोलनासंदर्भात थिएटर मालकांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे.मारहाणीविरोधात तुमच्याकडे पोलिसांत तक्रार करण्याचा पर्याय आहे. त्याचा या जनहित याचिकेशी संबंध नाही असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.

पुण्यातील एका मल्टीप्लेक्स थिएटरमध्ये खाद्यपदार्थ अवाजवी दरात विकल्याबद्दल ,तिथल्या कर्मचाऱयांना मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीविरोधात,मल्टीप्लेन्स मालक संघटनेने सोमवारी हायकोर्टात धाव घेतली होती.मात्र दिलेल्या आदेशात कोणताही बदल करण्यास हायकोर्टाने स्पष्ट नकार दिला.

 

Related posts: