|Saturday, July 20, 2019
You are here: Home » Top News » मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने हजारो कोटींचा जमीन घोटाळा : काँग्रेस

मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने हजारो कोटींचा जमीन घोटाळा : काँग्रेस 

ऑनलाईन टीम / मुंबई :

नवी मुंबईतील सिडकोच्या 24 एकर जागेबाबत मोठा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसने केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीने हा हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

तसेच यात मंत्रालयातील अनेक मोठय़ा अधिकाऱयांचा हात असून त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिडकोच्या ताब्यातील या जागेची किंमत बजारभावाप्रमाणे 1600 कोटी रूपये इतकी आहे.मात्र ती केवळ 3 कोटी रूपयांत बिल्डर मनिष भतिजा आणि संजय भालेराव यांना विकण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.