|Saturday, April 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सॅमसंग गॅलक्सी ऑन6 सादर

सॅमसंग गॅलक्सी ऑन6 सादर 

तरुण पिढीसाठी स्मार्टफोन : 5 जुलैपासून खरेदीसाठी उपलब्ध

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सॅमसंगकडून गॅलक्सी ऑन6 हा स्मार्टफोन भारतीय बाजारात उतरविण्यात आला. खास तरुण पिढीला नजरेसमोर ठेवत या स्मार्टफोनची निर्मिती करण्यात आली. थिन बेझल असून सेल्फी कॅमेरासह एलईडी फ्लॅश देण्यात आला. सॅमसंगकडून ‘चॅट ओव्हर व्हिडीओ’ ही नवीन सेवा स्मार्टफोनमधील व्हिडीओ पाहताना चॅट करण्याची सेवा पुरविते. याव्यतिरिक्त माय गॅलक्सी व्हिडीओ ऍप, तर सॅमसंग पे मिनी ही देयक सेवा पुरविण्यात आली. मुख्य कॅमेरामध्ये ऍनिमेटेड जीआयएफ, ब्युटी फेस, बेस्ट फोटो, फेस डिटेक्शन यासारखे फिचर्स देण्यात आले आहेत. ब्लॅक आणि ब्लू रंगातील हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि सॅमसंग ऑनलाईन शॉपमध्ये 5 जुलैपासून हा 14,490 रुपयांना उपलब्ध असेल. शाओमी रेडमी नोट 5 प्रो आणि रिअलमी 1 या स्मार्टफोनबरोबर याची स्पर्धा असेल.

या स्मार्टफोनची वैशिष्टय़े :

डिस्प्ले……… 5.60 इंच

प्रोसेसर……. एक्सिनोस 7870

ऑपरेटिंग प्रणाली            ऍन्ड्रॉईड 8

मुख्य कॅमेरा.. 13 मेगापिक्सल

सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सल

रॅम…………. 4 जीबी, रॉम 32 जीबी

बॅटरी     3000 एमएएच

 

Related posts: