भारतीय वेटलिफ्टर्सची मदार मीराबाई चानूवर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी सोमवारी भारतीय पुरुष व महिला वेटलिफ्टिंग संघाची घोषणा करण्यात आली. राष्ट्रकुल व जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱया मीराबाई चानूकडून भारताला यंदाच्या स्पर्धेत पदकाची अपेक्षा असणार आहे. मीराबाई 48 किलो वजन गटातून तर राखी हालदार 63 किलो गटातून उतरणार आहे.
पुरुषांमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाची कमाई करणाऱया खेळाडूंना आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. सतिश शिवलिंगम, अजय सिंग व विकास ठाकुर या तीन वेटलिफ्टर्सची संघात वर्णी लागली आहे. 2014 मधील आशियाई स्पर्धेत भारताने सहा जणांचा संघ उतरवला होता मात्र एकाही खेळाडूला पदक मिळवता आले नव्हते. यामुळे यंदाच्या स्पर्धेत भारताचे वेटलिफ्टर्स पदक मिळवून देतात, का हे पहावे लागेल.
भारतीय वेटलिफ्टिंग संघ – महिला – मीराबाई चानू (48 किलो), राखी हालदार (63 किलो). पुरुष – सतीश कुमार शिवलिंगम व अजय सिंग (77 किलो), विकास ठाकुर (94 किलो).