|Tuesday, September 25, 2018
You are here: Home » Top News » प्लास्टिकबंदी : मुंबईत 19 लाख 65 हजारांचा दंड वसूल

प्लास्टिकबंदी : मुंबईत 19 लाख 65 हजारांचा दंड वसूल 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यात प्लॉस्टिकबंदी जाहीर झाल्यानंतर मुंबई महापालिपेने एक हजार 507 किलो प्लॉस्टिक जप्त केले आहे. या कालावधीत नागीरकांकडून 19लाख 65 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

बीएमसीने 23 जून रोजी प्लॅस्टिकच्या वापरविरोधात मोहीम सुरू केली. प्लॉस्टिकचा वापर करणाऱया व्यक्तींकडून दंडवसुलीचे आदेश सरकारकडून देण्यात आले होते. दंड भरण्यास नकार देणाऱयांवर कारवाईसाठी प्रत्येक विभागात तक्रार प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने गेल्या दहा दिवसात एक हजार 507 किलो प्लॅस्टिक जप्त केले आहे. तर प्लास्टिक वापरणाऱयांकडून 19 लाख 65 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

 

Related posts: