|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » बुलेट ट्रेनच्या घोषणा पुरे ; आधी लोकल सेवा सुरक्षित करा : निरूपम

बुलेट ट्रेनच्या घोषणा पुरे ; आधी लोकल सेवा सुरक्षित करा : निरूपम 

ऑनलाईन टीम / मुंबई :

बुलेट ट्रेनच्या गप्पा पुरे, आधी लोकल सेवा सुरक्षित करा, अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी अंधरेतील पूल दुर्घटनेवरून रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘रेल्वेमंत्री कधी पूल बांधण्यासाठी लष्काराला मुंबईत आणतात, तर कधी बुलेट ट्रेनच्या मोठमोठय़ा घोषणा केल्या जातात.हे सर्व करण्याआधी त्यांनी मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित करावा, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी म्हटले आहे.

अंधेरीजवळचा पादचारी पूल आज सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी कोसळला. पुलाचा बराचसा भाग रेल्वे रुळांवर कोसळल्यानं पश्चिम रेल्वे®³ाा वाहतुकीचा खोळंबा झाला. यावरुन काँग्रेसनं सरकारवर निशाणा साधला. ’बुलेट टेनच्या गप्पा करण्याआधी मुंबईतील लोकल सेवा सुरक्षित करा. लोकल सेवा ही मुंबईकरांसाठी जीवन आहे. त्यामुळे मुंबईकरांचं जीवन सुरक्षित व्हायला हवं,’ असं काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटलं. ’रेल्वे प्रशासनानं अशा घटनांमधून बोध घ्यावा आणि मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित करण्यास प्राधान्य द्यावं,’ असंही ते म्हणाले.

 

Related posts: