|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » मुंबईकरांचे रात्रीपर्यंत हाल, लोकलसेवा पूर्ववत होण्यास मध्यरात्र होणार

मुंबईकरांचे रात्रीपर्यंत हाल, लोकलसेवा पूर्ववत होण्यास मध्यरात्र होणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकाजवळ असलेल्या पुलाचा भाग रेल्वे रूळावरून कोसळल्याने रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक खंडीत झाल्याने ऑफिसला जाणाऱया कर्मचाऱयांचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून कोसळलेल्या पुलाचा ढिगाला हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पश्चिम आणि हार्बर मार्गाला जोडणारी लोकलसेवा दुपारी दोन वाजता सुरूवात होईल तसेच पश्चिम मार्गावरील अप आणि डाऊन जलदगती मार्गावरील लोकसेवा संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. याशिवाय पश्चिम मार्गावरील अप आणि डाऊन स्लो मार्गाची सेवा मध्यरात्रीपर्यंत पूर्ववत होईल अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने ट्विटरद्वारे दिली आहे.