|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » इन्सुलीत ट्रकला कारची धडक

इन्सुलीत ट्रकला कारची धडक 

प्रतिनिधी / बांदा:

झाराप-पत्रादेवी बायपास महामार्गावरील इन्सुली-डोबवाडी येथे भरधाव वेगाने जाणाऱया अल्टो कारने ट्रकला पाठीमागून धडक दिली. धडकेनंतर ट्रकच्या मागे अडकलेली कार सुमारे 100 मीटर फरफटत गेली. अन्य वाहन चालकांनी ट्रक चालकाला अपघाताची खबर दिल्यानंतर ट्रक थांबविण्यात आला. अपघातात कारचालक श्रीकांत आजगावकर (45, रा. सावंतवाडी) हे कारमध्ये अडकल्याने गंभीर जखमी झाले. अपघाताचे वृत्त समजताच स्थानिकांनी रुग्णवाहिकेला पाचारण करीत आजगावकर यांना आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. हा अपघात मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास झाला. अपघाताची नोंद पोलिसात करण्यात आली नव्हती.

झाराप-पत्रादेवी बायपास महामार्गावरील इन्सुली-डोबवाडी येथे म्हापसा येथून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱया अल्टो कारने ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात ट्रकच्या मागे अल्टो कार अडकून सुमारे 100 मीटर फरफटत गेली. मुसळधार पाऊस असल्याने ट्रकचालकाला अपघाताची कल्पना आली नाही. अपघाताचे वृत्त समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत कारचालक आजगावकर यांना बाहेर काढले. डॉ. प्रियंका भागवत यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना बांदा आरोग्य केंद्रात दाखल पेले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणाली कासार यांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपसरपंच अक्रम खान, राजू खान, ज्ञानेश्वर सावंत आदींनी मदत कार्यात सहभाग घेतला. स्थानिक व पोलिसांनी ट्रकच्या मागे अडकलेल्या कारला बाहेर काढत महामार्ग वाहतुकीस मोकळा केला.