|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » डीकेटीईचे इंजिनिअरींगचे विद्यार्थी पुणे येथे शिक्षण घेण्यासाठी सज्ज

डीकेटीईचे इंजिनिअरींगचे विद्यार्थी पुणे येथे शिक्षण घेण्यासाठी सज्ज 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

येथील डीकेटीई सोसायटीचे टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट, इचलकरंजी व कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे (सीओईपी) या दोहोमध्ये एआयसीटीई मार्गदर्शन स्कीम अंतर्गत शैक्षणिक सामंजस्य करार झाला असुन, या कराराअंतर्गत डीकेटीईचे 3 इंजिनिअरींगचे विद्यार्थी एका सेमिस्टरसाठी सीओईपी पुणे येथे शिक्षण घेण्यासाठी रवाना होत आहेत. तसेच डीकेटीईचे 2 विद्यार्थी या संस्थेत नुकतेच एक महिना कलावधीसाठी प्रशिक्षण संपादन करुन आलेले आहेत.

सीओईपी, पुणे हे संपुर्ण अशिया खंडात नामांकित व गव्हर्मेट ऑफ महाराष्ट्र यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेले ऍटोनॉमस इन्स्टिटयूट आहे. सीओईपीचे डायरेक्टर प्रा. डॉ. बी. बी. अहुजा, प्रा. डॉ. एस.एस. परदेशी व प्रा. डॉ. एन. के. चौगुले यांनी डीकेटीईस भेट दिली व या दोन इन्स्टिटयूटमध्ये शैक्षणिक सामंजस्य करार संपन्न झाला. या कराराअंतर्गत डीकेटीईच्या कॉम्प्युटर सायन्स मधील अपूर्वा पीसे, इलेक्ट्रॉनिक्स मधील हिरकणी दाणेकरी व  आर्या कुलकर्णी हे 3 इंजिनिअरींगचे विद्यार्थी एका सेमिस्टरसाठी सीओईपी पुणे येथे शिक्षण घेण्यासाठी रवाना होत आहेत.

हे विद्यार्थी सीओईपी पुणे येथे तेथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत शिक्षण संपादन करतील व परिक्षा देतील. डीकेटीई ही ऍटोनोमास संस्था असल्यामुळे निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मिळालेले मार्कस क्रेडीटच्या स्वरुपात              येथील डीकेटीई मार्कशिटमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. यामुळे सीओईपी येथील असलेल्या अधुनिक शैक्षणिक सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळत आहे. सीआईपी येथिल तज्ञ प्राध्यापक या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी, प्रकल्पासाठी मार्गदर्शन करतील. यासमवेत डीकेटीईचे द्वितीय वर्ष इलेक्ट्रानिक्स मधील विद्यार्थ्यानी किर्ती किर्तणे व द्वितीय वर्ष कम्प्युटर सायन्स मधील विद्यार्थी ? शिकेश देसाई हे सीओईपी येथे नुकतेच महिनाभरासाठी प्रशिक्षण संपादन करुन आलेले आहेत. यामध्ये त्यांनी ऍडव्हान्स रिसर्च लॅबोरेटरी येथे संशोधन व प्रात्यक्षिक केले. त्याचबरोबर विविध इंडस्ट्रीजना  भेट दिली. याशिवाय जर्मन व जापनीज भाषा आत्मसात केली. त्यामुळे कंपन्याकडून प्लेसमेटसाठी या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळेल.

यामुळे दरवर्षी डीकेटीईच्या गुणवंत्त विद्यार्थ्याना या कराराद्वारे इंजिनिअरींगच्या एकूण आठ सेमिस्टर पैकी एका सेमिस्टरसाठी सीओईपी येथे शिक्षण संपादन करणे शक्य होणार आहे. याव्यतीरीक्त डीकेटीईतील प्राध्यपकांना व विद्यार्थ्याना सीओईपी येथे पीएचडी शिक्षण घेण्यासाठी देखील प्राधान्य मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना इंडस्ट्री इंटरऍक्शन, इंडस्ट्रीएल ट्रेनिंग, इंडस्ट्री संशोधनाद्वारे भविष्यामध्ये त्यांच्या उज्वल करिअरसाठी लाभ होणार आहे. या विद्यार्थ्यांना संस्थेचे डायरेक्टर प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, डे.डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील, डे.डायरेक्टर ऍकॅडमिक्स डॉ.सौ एल.एस.अडमुठे, डीन प्रा. आर. एन. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Related posts: