|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » जिओचा दुसरा फोनही ग्राहकांच्या भेटीला ; नव्या फोनमध्ये व्हॉटस् ऍप चालणार

जिओचा दुसरा फोनही ग्राहकांच्या भेटीला ; नव्या फोनमध्ये व्हॉटस् ऍप चालणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वार्षिक बैठकीमध्ये रिलायन्स जिओच्या दुसऱया फोनची घोषणा करण्यात आली आहे. जिओ फोन-2 हा फोन जिओ वनचे पुढील व्हर्जन असेल. यामध्ये पहिल्या जिओ फोनमध्ये नसलेल्या अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. रिलायन्स जिओने आता टीव्ही क्षेत्रात आपले पाऊल टाकत ‘जीओ गीगा टीव्ही’ लाँच केले आहे. मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात रिलायन्सची बैठक सुरू आहे.

रिलायन्स समूहाच्या 41 व्या वार्षिक बैठकील 11 वाजता सुरूवात झाली. या बैठकीत जिओ-2 ची घोषणा करण्यात आली. यामध्ये व्हॉट्सऍप वापरता येऊ शकते. याआधी लॉन्च करण्यात आलेल्या जिओच्या फोनमध्ये व्हॉट्सऍपची सुविधा नव्हती. जिओ फोन-2 मध्ये आडवी स्क्रिन असेल. मात्र जिओ फोन-2 लॉन्च केल्यावरही पहिल्या जिओ फोनचे उत्पादन बंद केले जाणार नाही. हे दोन्ही फोन बाजारात उपलब्ध असतील. रिलायंन्स जिओच्या नव्या फोनवर 15 ऑगस्टपासून यूटय़ूब, फेसबुक आणि व्हॉटस्ऍप सारख्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. जिओ फोन 2 ची किंमत 2,999 रूपये निश्चित करण्यात आली आहे. आपण 501 रूपये देऊन जुन्या जिओ फोनच्या बदल्यात नवा जिओ फोन 2 खरेदी करू शकता.

Related posts: