|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पेपरलेस कारभारात सोलापूर राज्यात अव्वल

पेपरलेस कारभारात सोलापूर राज्यात अव्वल 

गणेश क्षीरसागर /सोलापूर :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेले डिजीटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यसरकारकारने देखील पाऊले उचलली आहेत. डिजीटल महाराष्ट्र करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्य सरकारच्या प्रयत्नाला जिल्हा परिषदेने प्रतिसाद देत, कारभार डिजीटल करण्यासाठी अट्टाहास मांडला आहे. याचाच एक भाग म्हणून जिह्यातील 131 ग्रामपंचायती आपले सरकार सेवा केंद अंतर्गत पूर्णपणे संकणीकृत आहेत. या हायटेक ग्रामपंचायतींचा सर्व कारभार आता संगणकावरच चालवला जात आहे. या ग्रामपंचायतींची कामकाजाची कालबाह्य पध्दती जावून या ग्रामपंचायती पेपरलेस झाल्या आहेत. पेपरलेस ग्रामपंचायतीच्या कारभारात जिल्हा राज्यात अव्वलस्थानी असून, जिल्हा परिषदेच्या पेपरसेल कारभाराचा नवा पॅटर्न राज्यापुढे आदर्श म्हणून आला आहे.

राज्यातील सर्व ग्रामपंचायती संगणकीकृत करण्याचा आपले सरकार सेवा केंद्र हा उपक्रम आहे. या अर्तंगत जिह्यात ग्रामपंचायतीचे कामकाज संगणकीकृत करण्याकरीता ’ई-ग्राम’ सॉफ्टवेअरचा वापर करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत.

या ई-ग्राम सॉफ्टवेअरचा उद्देश ग्रामपंचायताकडील सर्व 1 ते 33 नोंदी अद्ययावत करणे, तसेच 1 ते 19 प्रकारचे संगणीकृत दाखले नागरिकांना हा आहे. जेणे करुन ग्रामपंचायतींनी यापुढे त्यांचे कोणतेही कामकाज हस्तलिखीत न करता संगणकाद्वारेच करण्याची योजना आहे. या योजनेच्या अनुषंगाने ज्या ग्रामपंचायतींनी त्यांचे सर्व लेखे ई-ग्राम सॉफ्टवेअरमध्ये अद्ययावत केले आहेत. अशा ग्रामपंचायतींचे 1 ते 33 नोंदवह्या पंचायत समिती कार्यालयामाफ्&ढत सीलबंद करुन पंचायत समिती कार्यालयात जमा करुन घेण्याचे निर्देश होते. 

या योजनेची अंमलबजावणी करताना जे सॉफ्टवेअर वापरण्यात येईल त्याला इंटरनेटची गरज नसल्याने सर्वच ग्रामपंचायतींमध्ये याचा वापर करणे सोपे आहे. शिवाय सरकारकडून याचा वापर करणे बंधनकारकही करण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिह्यात 131 ग्रामपंचायतींनी त्यांचे सर्व कामकाज संगणीकृत करुन ग्रामपंचायतींना पेपरलेस केले आहे.