|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » विविध मागण्यांसाठी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे धरणे आंदोलन

विविध मागण्यांसाठी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे धरणे आंदोलन 

प्रतिनिधी /सातारा :

शेतकऱयांच्या विविध मागण्यासंदर्भात शासनाकडून होत असलेली दिरंगाई, पेट्रोल, डिझेल, दरवाढ व उल्पसंख्यांक समाजातील लोकांवर होत असलेले अन्याय यासाठी गुरुवारी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे यांच्या नेतृत्वाखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

  युवराज कांबळे व त्यांच्या सहकार्यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हंटले आहे की, शेतकऱयांवर कर्जाचा बोज वाढत आहे. जीवनावश्यक वस्तुंची भाववाढ व पेट्रोल, डिझेलची दरवाढ, कर्ज बाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. भिमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी संभाजी भिडे अद्याप मोकाट आहेत. मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्ती वाढ करून नियमिता आणावी. पुजा सकटच्या मृत्यूची चौकशी करून दोषींवर काडक कारवाई कधी करणार. वाकडी ता. जामणेर जि. जळगाव येथील मातंग मुलाची नग्न धींड काढून मारहाण करणाऱयांवर कडक कारवाई कधी करणार. कैकाडी समाजावर नारायण गाव येथे अन्याय, अत्याचार करणाऱया गुंडावर कडक कारवाई कधी होणार, अहमदपूर लातुर येथील कोमल आनंद पवार या वडार जातीच्या मुलीवर अत्याचार करणाऱयांवर कठोर कारवाई कधी करणार. धनगर आरक्षणासाठी चौंडी येथे आंदोलन करणाऱया कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे कधी घेणार. समतानगर जळगाव येथील वाल्मिकी मेहतर समाजाची अक्षरा या मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱया नरधमांवर कठोर कारवाई कधी करणार. पश्चिम महाराष्ट्रातील 60 हजार विद्यार्थ्यांचे उशीरा निकाला आभावी होत असलेले नुकसानीबद्दल कोण जबाबदार राहणार. अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. यावेळी संजय पाटील, साईनाथ तुपे, हनमंत कांबळे, बळीराम जाधव, शांतीलाल माने, मनोहर पवार, योगेश घाडगे उपस्थित होते.

a