|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मिरज ‘हाय होल्टेज’च्या मार्गावर..!

मिरज ‘हाय होल्टेज’च्या मार्गावर..! 

के.के.जाधव /मिरज :

महापालिका निवडणूक निमित्ताने मिरजेच्या राजकर्त्यांची प्रथमच अनेक विभागात शकले झाली आहेत. जामदार-मेंढे काँग्रेस सोबत, नायकवडी-बागवान राष्ट्रवादी सोबत, आवटी-कांबळे-कुरणे भाजपा सोबत तर अनिलभाऊ कुलकर्णींची स्वतंत्र आघाडी कार्यरत झाली आहे. निश्चितच यामुळे प्रत्येकाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यातून तोडीस तोड उमेदवार समोर येऊ लागल्याने विजयासाठी साम, दाम, दंडाचा वापर मोठय़ा प्रमाणात होण्याची शक्यता बळावत आहे. काही प्रभागातून बाचाबाची आणि हाणामारीने त्याचा प्रारंभही झाला आहे. आगामी निवडणूक काळात यामध्ये वाढच होण्याची चिन्हे दिसत असल्याने मिरज ‘हाय होल्टेज’च्या मार्गावर दिसत आहे.

गेल्या काही वर्षात मिरजेच्या राजकारणावर जामदार, नायकवडी, आवटी, बागवान यांनी प्रभुत्व गाजविले आहे. या स्थानिक नेत्यांनी ‘मिरज पॅटर्न’च्या नावावर सांगलीतील बडय़ा-बडय़ा नेत्यांच्या नाकी दम आणला होता. या पॅटर्नमध्ये कॉंग्रेसनेते स्व. मदनभाउढ पाटील आणि सध्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंतराव पाटील हे दिग्गजसुध्दा फसले आहेत. मिरजेच्या या नेत्यांनी महापालिकेच्या अस्तित्वापासून सत्तेत वर्चस्वाबरोबर †िरमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवण्यात यश मिळविले आहे. एकसंघतेमुळे हे नेते आपल्या प्रत्येक योजनांमध्ये यशस्वी ठरत गेले होते. त्यांनी अपवाद वगळता बऱयाचवेळा एकत्रित निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता. नायकवडी-बागवान-आवटी यांनी महाआघाडीच्या माध्यमातून आमदार जयंत पाटील यांना साथ देत स्व. मदनभाऊ पाटील यांच्या हातातून सत्ता काढून घेतली होती. यावेळी जामदार एकटे पडल्याने ते अपयशी ठरले होते. त्यानंतर जामदार-नायकवडी-आवटी यांनी एकत्रित येऊन आमदार जयंत पाटील यांच्या ताब्यातील सत्ता पुन्हा स्व. मदनभाऊ पाटील यांना मिळवून दिली होती. यावेळी बागवान एकटे पडले होते.