|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून एकाची गोळय़ा झाडून निघृण हत्या

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून एकाची गोळय़ा झाडून निघृण हत्या 

ऑनलाईन टीम / एटापल्ली :

पोलिसांचा खबऱया असल्याच्या संशयातून एका इसमाची नक्षलवाद्यांनी गोळय़ा झाडून निर्घृण हत्या केली आहे. एटापल्ली तालुक्मयातील सोनभट्टी गावातील शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जारावंडी उप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनभट्टी या गावातील इसरू पोटावी याला जवळपास – 20 नक्षलवाद्यांनी घरातून जंगलात नेले. तिथेच गोळय़ा झाडून त्याची निर्घृण हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह गावाजवळच्या रस्त्यावर आणून टाकला. मृतदेहासोबत एक चिठ्ठीदेखील सोडली होती. या चिठ्ठीमध्ये पोलिसांचा खबऱया असल्याने इसरू पोटावीची हत्या करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. रविवारी सकाळी रस्त्यावर इसरू पोटावीचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.