|Thursday, July 18, 2019
You are here: Home » leadingnews » थायलँडमधील गुहेतून 2 मुलांना बाहेर काढण्यात यश

थायलँडमधील गुहेतून 2 मुलांना बाहेर काढण्यात यश 

ऑनलाईन टीम / थायलँड :

थायलँडमध्ये गुहेत अडकलेल्या 12 मुलांपैकी 2 मुलांना बाहेर काढण्यात यश आले असल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. अजून चार मुल वेळेतच बाहेर येतील असे लेफ्टनंट जनरल काँगचीप यांनी सांगितले आहे.

चाईंग प्रांताचे मुख्य आरोग्य अधिकारी टोसाथेप बूंथाँग यांनी दोन मुलांना या गुहेतून बाहेर काढण्यात आल्याचे म्हटले आहे. ही मुले सध्या गुहेनजीक उभारण्यात आलेल्या फिल्ड हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात येत असून अजून त्यांना चाईंग राई हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेले नाही, असे त्यांनी सांगितले. गुहेपासून सर्वांत जवळचे हॉस्पिटल 1 तासाच्या अंतरावर आहे, हॉस्पिटलच्या जवळ या मुलांचे पालक आणि नातेवाईक थांबले आहेत.