|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गुढेत नळपाणी योजनेची विहीर कोसळली!

गुढेत नळपाणी योजनेची विहीर कोसळली! 

वार्ताहर/ मार्गताम्हाने

चिपळूण तालुक्यातील गुढे-बुधरवाडी येथील नळपाणी पुरवठा करणारी विहीर मुसळधार पावसात कोसळल्याने येथील 3 वाडय़ांच्या पाणी पुरवठय़ावर परिणाम झाला आहे. तरी ही विहीर तातडीने दुरुस्त करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रामपूर-मार्गताम्हाने परिसरात सध्या मुसळधार पाऊस पडत असल्याने रस्त्यांवर पाणी येणे, रस्ते वाहून जाणे, झाडे कोसळणे आदी घटना घडत आहेत. गेल्याच आठवडय़ात कात्रोळी येथील हायस्कूलच्या इमारतीची पडवी कोसळली होती. दोनच दिवसांपूर्वी गुढे-बुधरवाडी येथील नळपाणी योजनेची विहीर कोसळली. पाण्याच्या प्रवाहाने या विहिरीचे बांधकाम ढासळल्याने संपूर्ण दगड, माती विहिरीत कोसळले आहेत. पाणी खेचणाऱया पंपाचीही दुरवस्था झाली असून 3 वाडय़ांच्या नळपाणी पुरवठय़ावर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने या बाबत कार्यवाही करुन विहीर तातडीने दुरुस्त करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.