|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Top News » पेणजवळ एसटीच्या अपघातात 10 प्रवासी जखमी

पेणजवळ एसटीच्या अपघातात 10 प्रवासी जखमी 

ऑनलाईन टीम / पेण :

एसटी बसच्या अपघातांची मालिका सुरूच असून पेणजवळील वरवणे येथे वाहनाला वाचवण्याचा प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बसचा अपघात झाला. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत.

पेणमधील वरवणे येथे समोरुन येणाऱया वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नाच एसटी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यानंतर बस रस्त्यावरुन उतरुन लगतच्या शेतात घुसली. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. महागाव – पेण बसला अपघात झाला असून अपघाताचे वृत्त समजताच पोलीस व एसटी प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Related posts: