|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » उद्योग » पहिल्या तिमाहीत टीसीएसला 7 हजार कोटीहून जादा फायदा

पहिल्या तिमाहीत टीसीएसला 7 हजार कोटीहून जादा फायदा 

वृत्तसंस्था/ मुंबई

देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्यात करणारी कंपनी टाटा कंन्सलटींग सर्विसेस (टीसीएस) चालू आर्थिक वर्षांत जूनमध्ये पहील्या तिमाहीत 7 हजार 340 कोटी रुपयांचा फायदा झाला असल्याची माहिती कंपनी कडून सांगण्यात आली आहे.

मागील वर्षांच्या समांतर तिमाहीपेक्षा 23.4 टक्के जादा फायदा झाला आहे. यात मागील वर्षात 5 हजार 945 कोटीचा फायदा कंपनीला झाला होता. शेअर बाजारातील करण्यात आलेल्या सूचनेनुसार व्यवहारातील वाढीचा दर 15.8 टक्क्यांनी वाढला असून त्याचा व्यवसाय 34 हजार 261 कोटीवर पोहोचला आहे. अशी माहिती टीसीएसचे मुख्य अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी दिली आहे.

टीसीएसने एक रुपय शेअर्सवर चार रुपये प्रति इक्विटी शेअरच्या लाभधारकांना फायदा मिळणार असल्याची घोषण केली आहे. बीएसईच्या बाजारात कंपनीला नुकसानीचा दर 0.56 टक्क्यावरुन 1 हजार 877 रुपयावर आला आहे. तर कंपनीने 16 हजार कोटीची नवीन खरेदी करण्याची घोषणा केली आहे. बोनस शेअरची कंपनीने घोषण कोली आहे.