|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » पेणजवळ एसटीचा अपघात ; 15 जण जखमी

पेणजवळ एसटीचा अपघात ; 15 जण जखमी 

प्रतिनिधी मुंबई

एसटी बसच्या अपघातांची मालिका सुरुच असून पेणजवळील वरवणे येथे समोरुन येणाऱया वाहनाला वाचवण्याचा प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बसचा अपघात झाला. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले असून एक प्रवासी गंभीर जखमी आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास घडला.

पेणमधील वरवणे येथे समोरुन येणाऱया वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नाच एसटी (MH 07 C 7398) चालक ऐ आर गायकवाड बसवरील नियंत्रण सुटले. यानंतर बस रस्त्यावरुन उतरुन लगतच्या शेतात घुसली. या अपघातात 22 प्रवासी जखमी झाले आहेत. महागाव-पेण बसला अपघात झाला असून जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

 

Related posts: