|Monday, November 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आपत्ती नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज

आपत्ती नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज 

कोल्हापूर

 जिह्यात आपत्ती नियंत्रणासाठी व संभाव्य पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आहे.  पुरबाधित गावांमध्ये आपदा मित्रांचे पथक तैनात केले जाईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत 15 दिवसांसाठी आयोजित केलेल्या आपदा मित्र प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र आणि आपदा मित्र किटचे वितरण जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते  होमगार्ड प्रशिक्षण केंद्रामध्ये करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, सिव्हील डिफेन्सचे उप नियंत्रक एस.बी.बागट, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ  उपस्थित होते.

आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत देशातील 30 जिह्यामधून कोल्हापूर जिह्याची निवड झाली असून या कार्यक्रमांतर्गत जिह्यातील 200 स्वयंसेवकांची निवड करुन त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जात आहे.  पहिल्या टप्यात जिह्यातील 65 जणांना पुरव्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले असून यापुढील काळात उर्वरित स्वयंसेवकांना टप्प्या टप्याने प्रशिक्षण दिले जाईल. तसेच आपदा मित्राच्या धर्तीवर आपदा युवतींचे पथक निर्माण केले जाईल, असेही जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले.

जिह्यात 129 पुरबाधित गावे असून या गावात पुर नियंत्रण व व्यवस्थापनास सहाय्य व्हावे, यासाठी प्रत्येक गावात आपदा मित्र तैनात करुन गाव पातळीवरही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम बनविली जाईल.  संभाव्य काळात पुरपरिस्थिती उद्भवल्यास पुरबाधित गावातील जनतेचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याची व्यवस्था करण्याबरोबरच पुर परिस्थितीत बचाव आणि मदत कार्य युध्द पातळीवर करण्यासाठी यंत्रणा आणि गावकऱयांबरोबरच आपदा मित्राचे महत्वपूर्ण योगदान राहणार आहे. आपदा मित्राच्या माध्यमातून गावागावात 10 लोकांचे इमिजेट रिस्पॉन्स पथक तयार करुन त्यांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण देण्यास प्राधान्य दिले आहे.

संभाव्य काळात पुरपरिस्थिती उद्भवल्यास आपदा मित्रानी सर्वांना बरोबर घेवून बचाव  आणि मदत कार्याचे योग्य व्यवस्थापन करावे. यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक सर्व मदत आणि पुढाकार घेतला जाईल. पुर परिस्थितीत भुस्स्खलन, अपघात यासारख्या आपत्तींना तोंड देणे महत्वाचे असून आपदा मित्रानी धैर्य आणि आत्मविश्वासपूर्वक काम करुन पूरग्रस्थांसाठी सहायभुत व्हावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे म्हणाले, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्याचं काम कोल्हापूर जिह्यात सर्वप्रथम होत आहे. पुरपस्थितीत घ्यावयाची दक्षता आणि करावयाच्या उपाय योजनांचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेवून आपदा मित्रानी आपत्ती नियंत्रणाचे महत्वपूर्ण काम करावे. संभाव्य काळातील पुरपरिस्थिती उद्भवल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आणि सजग असल्याचे ते म्हणाले.

Related posts: