|Monday, November 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » थायलंडच्या मदतीला किर्लोस्कर कंपनीचे पंप

थायलंडच्या मदतीला किर्लोस्कर कंपनीचे पंप 

प्रतिनिधी/ सांगली

थायलंडमधील गुहेमध्ये अडकलेल्या फुटबॉल खेळाडूंच्या सुटकेसाठी किर्लोस्कर बदर्सचे चार पंप मदतीला गेले आहेत. मिरजेच्या प्रसाद कुलकर्णी यांनी डिझायनिंग केले असून अवघ्या दोन दिवसात पंप तयार करण्यात आले होते. सध्या प्रसाद कुलकर्णी यांच्यासह किर्लोस्कर ब्रदर्सची टीम या मोहिमेत सहभागी झाली होती.

थायलंड येथील सुमारे सात किमी अंतराच्या गुहेत अतिवृष्टीमुळे गुहेत पाणी शिरल्याने कोचसह संपूर्ण फुटबॉलची टीम अडकून पडली होती. त्यामुळे थायलंड सरकारने भारत सरकारकडे मदतीसाठी केबील फ्लड पंपांची मागणी केली होती. त्यानुसार भारत सरकारने किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीला चार पंप पुरवठा करण्याची परवानगी दिली होती. तेथील परिस्थितीचा अंदाज घेत किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीने अवघ्या दोन दिवसात चार पंप तयार करून गेल्या शुक्रवारी ते पाठविण्यात आले होते. गुहेतील साठलेले पाणी बाहेर काढण्यात आणि मोहीम यशस्वी करण्यात या पंपांचे मोठे योगदान लाभले असल्याचे सांगण्यात आले.

कंपनींचे एक्सपोर्ट एक्सलन्स सेलचे प्रमुख आणि या मोहिमेत सहभागी झालेले प्रसाद कुलकर्णी यांनी या पंपाचे डिझायनिंग केले असून ते स्वत: हे पंप घेऊन थायलंडला गेले आहेत. प्रसाद कुलकर्णी हे मूळचे मिरजेचे आहेत. त्यांच्या सोबत कंपनीचे सिस्टीम रिसर्च विभागाचे प्रमुख शाम शुक्ल हेही सहभागी झाले असल्याचे सांगण्यात आले.

Related posts: