|Saturday, November 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अहिंसा पतसंस्थेस यास्मिनची सदिच्छा भेट

अहिंसा पतसंस्थेस यास्मिनची सदिच्छा भेट 

वार्ताहर/ म्हसवड

म्हसवड येथे खासगी कामानिमित्त आलेली ‘लागिरं झालं जी’ फेम यास्मिन म्हणजेच, लक्ष्मी विभुते यांनी अहिंसा पतसंस्थेस सदिच्छा भेट दिली.

याप्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांनी संस्थेच्या कामाविषयी माहिती दिली. स्वागत व प्रास्ताविक नीरज व्होरा यांनी केले. यावेळी युक्रादचे कार्यकर्ते राजकुमार डोंबे, संचालक महावीर व्होरा, अनील देशमाने, जयंत दोशी, डॉ. राजेश शहा, प्रीतम शहा, एल.आय.सी एजंट देशमुख, इंदिरा दोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

विभूते यांनी, अहिंसा पतसंस्थेचे कामकाज पाहून समाधान व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, अहिंसा पतसंस्था जी सर्वांसाठी काम करत आहे, ते नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. तसेच ‘लागिरं झालं जी’मधील यास्मिनच्या भूमिकेतील वैशिष्ठे ही त्यांनी विषद केली. त्याचबरोबर उपस्थितांच्या आग्रहास्तव त्यांनी या मालिकेतील काही संवाद ही सादर केले. चेअरमन नितीन दोशी यांनी, लक्ष्मी विभूते यांच्या यास्मिनच्या भूमिकेबद्दल कौतुक केले व लागिरं झालं जी ही मालिका महाराष्ट्रात घराघरात पोहोचली असून या मालिकेतील प्रत्येक पात्र लोकप्रिय झाले आहे. विभूते यांची यास्मिनची भूमिका आव्हानात्मक असून त्यांनी अतिशय उत्तमरित्या पार पाडून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. म्हणूनच, त्यांच्या उत्कृष्ट भूमिकेमुळेच त्या मालिकेत रंगत आली आहे. 

याप्रसंगी युक्रादचे कार्यकर्ते राजकुमार डोंबे म्हणाले, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात युक्राद व भूमाता संघटना नक्कीच यशस्वी ठरली आहे. याच माध्यमातून मला समाजिक काम करण्याची संधी मिळाली. त्याचा उपयोग सर्व समाजाच्या हितासाठी करण्याचा प्रयत्न करीत असून अहिंसा पतसंस्था, म्हसवड परिसरात मोलाचे काम करीत आहे. 

यावेळी अबोली दोशी, जयश्री डोंगरे, संस्थेचे व्यवस्थापक महेश पतंगे, प्रशांत आहेरकर, प्रियांका आहेरकर यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Related posts: