|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » leadingnews » अमरोळीत संतप्त प्रवाशांचा रेलरोको

अमरोळीत संतप्त प्रवाशांचा रेलरोको 

ऑनलाईन टीम / पालघर

पालघरमधील उमरोळी येथे प्रवाशांच्या संतापाचा उदेक झाला असून बुधवारी सकाळी स्थानिकांनी ‘रेल रोको’ केला. मंगळवारपासून उमरोळी स्थानकामध्ये गाड्या न थांबवल्याने स्थानिक प्रवाशांनी रेल रोको आंदोलन केले.

 

उमरोळी स्थानकात गेल्या 24 तासांपासून लोकल टेन पोहोचलेली नाही. त्यामुळे एक्स्प्रेस गाड्यांना थांबा द्यावा, अशी स्थानिकांची मागणी होती. बुधवारी सकाळी प्रवाशांच्या संतापाचा उदेक झाला. संतप्त प्रवाशांना रेल्वे रुळांवर उतरून तिथून जाणारी एक एक्स्प्रेस रोखून धरली. अखेर एक्स्प्रेसला थांबा देण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिल्यानंतर रेल रोको मागे घेण्यात आला.

 

Related posts: