|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » Top News » 24 तासानंतरही पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

24 तासानंतरही पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत 

ऑनलाईन टीम / पालघर :

चोवीस तासांपेक्षा जास्त काळ ठप्प असलेली विरार ते भाईंदर लोकल सेवा बुधवारी दुपारनंतर संथगतीने सुरु झाली. पाणी ओसरल्यानंतरच वाहतूक पूर्ववत होईल, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी देखील पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना अडचणींचा सामना करतच कार्यालय गाठावे लागणार आहे.

मुंबई, ठाणे आणि परिसरात पावसाच्या रुद्रावतारामुळे मंगळवारी सकाळी मध्य, हार्बर तसेच पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. बुधवारी पावसाचा जोर कमी झाला असून मध्य व हार्बर रेल्वेवरील वाहतूक सुरळीत सुरु आहे. मात्र, पश्चिम रेल्वेवर विरार ते भाईंदर या मार्गावरील वाहतूक 24 तासानंतर संथगतीने सुरु झाली. या मार्गावर सध्या 10 किमी प्रति तास या वेगाने लोकल गाडय़ा चालवल्या जात आहे.

 

Related posts: