|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » Top News » विधानसभेत नितेश राणे आक्रमक, राजदंड पळविण्याचा प्रयत्न

विधानसभेत नितेश राणे आक्रमक, राजदंड पळविण्याचा प्रयत्न 

ऑनलाईन टीम / नागपूर :

नाणार प्रकल्पावरून आज विधानसभेत पुन्हा गोंधळ सुरू झाला आहे. नाणार प्रकल्पाला विरोध करत आमदार नितेश राणे आणि आमदार प्रताप सरनाईक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी विधानसभा अध्यक्षांच्या समोरुन नितेश राणे आणि सरनाईक यांनी राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. तर शिवसेनेने सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली असून विरोधकांनीही नाणार प्रकल्पावरुन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

रत्नागिरी जिलह्यातील प्रस्तावित नाणार मेगा रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिक शेतकरी, नागरिकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल. स्थानिकांच्या संमतीशिवाय हा प्रकल्प लादला जाणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधान परिषदेत म्हटले होते. मात्र, आज पुन्हा नाणार प्रकल्पावरुन विधानसभेत गोंधळ घालण्यात आला. नाणार प्रकल्पाला शिवसेनेसह इतरही राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. तर कोकणचे नेते राणे पुत्र आमदार नितेश राणे या मुद्यावरुन आक्रमक झाल्याचे दिसून आले. दरम्यान, मंगळवारी नाणार प्रकल्पावरून विधान परिषदेत विरोधक व सत्ताधारी सदस्यांमध्ये खडाजंगी झाली. काँग्रेसचे संजय दत्त यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यावर सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली होती.

 

Related posts: