|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » leadingnews » ताजमहल उद्धवस्त करून टाका : सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले

ताजमहल उद्धवस्त करून टाका : सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

मोगकालीन या ऐतिहासिक इमारतीच्या संरक्षणाबाबत कोणती भूमिका घेतल्याचे दिसत नाही. एकतर आम्ही ताजमहल बंद करू किंवा तुम्ही तर तो उद्धवस्त करून टाका, अशा कठोर शब्दांत सुप्रिम कोर्टाने केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला फटकारले आहे.

ताजमहलच्या डागडुजीबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने आपले मत व्यक्त केले. सोळाव्या शतकातील उभारलेली ही सुंदर संगमरवरी इमारत पाहण्यासाठी देशभरासह जगभरातून लाखो पर्यटक येथे येतात. मोगल बादशहा शाहजहाने बेगम मुमताजच्या स्मरणार्थ ही वास्तू बांधली होती.

न्यायालयाने यूरोपमधील सुप्रसिद्ध आयफेल टॉवरची तुलना टीव्ही टॉवरशी केली. आठ कोटी लोक आयफेल टॉवर पाहायला जातात. हा टॉवर टीव्ही टॉवरसारखा दिसतो. आपला ताजमहल त्याच्यापेक्षा कैकपटीने सुंदर आहे. जर त्याची योग्य देखभाल केली तर परकीय चलनाचे आपले संकट टळण्यास मदत होऊ शकते. तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या उदासिनतेमुळे देशाचे किती मोठे नुकसान होत आहे, अशा शब्दांत केंद्र सरकारलाही फटकारले.

 

 

Related posts: