|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दिल्ली हादरविण्याचा कट उधळला

दिल्ली हादरविण्याचा कट उधळला 

आयएस आत्मघाती दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय सुरक्षा यंत्रणांनी स्वतःच्या साहस आणि सामर्थ्याची ओळख करून देत एका अभूतपूर्व काउंटर इंटेलिजेन्स ऑपरेशनमध्ये इस्लामिक स्टेटचा एक मोठा कट  हाणून पाडला आहे. यांतर्गत अफगाणच्या आत्मघाती हल्लेखोरांद्वारे नवी दिल्लीला हादरविण्याचा कट रचण्यात आला होता. परंतु भारताने त्यांचा कट उधळून लावला आहे.

या कटाला दहशतवाद्यांनी ‘इंडियन प्लँट’ नाव दिले होते. यांतर्गत आयएस आत्मघाती हल्लेखोराला भारतात पाठविण्यास आणि राष्ट्रीय राजधानीत त्याची राहण्याची व्यवस्था करण्यास ते यशस्वी ठरले होते. याप्रकरणी भारतीय यंत्रणांनी नवी दिल्लीत सप्टेंबर 2017 मध्ये अटक केली, परंतु सर्वोच्च यंत्रणा आणि गुप्तचर सूत्रांनी आता याची पुष्टी दिली आहे.

महत्त्वाचे खुलासे

आयएसचा हल्लेखोर नवी दिल्लीत अभियांत्रिकी विद्यार्थ्याच्या स्वरुपात राहत होता. अटकेनंतर त्याला अफगाणमध्ये पाठविण्यात आले आणि सध्या तो अमेरिकेच्या सैन्यतळावर कैद असल्याचे समजते. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारावर अमेरिकेच्या सैन्याला तालिबानच्या विरोधात महत्त्वाचे यश मिळाले आहे. अफगाण, दुबई आणि नवी दिल्लीत सुमारे 18 महिन्यांच्या देखरेखीनंतर गुप्तचर यंत्रणांना 12 आयएस हस्तकांच्या एका पथकाला पाकिस्तानातील प्रशिक्षणानंतर बॉम्बस्फोटांसाठी भारतात पाठविण्यात आल्याचे समजले होते. हे सर्व दहशतवादी अफगाणी नागरिक आहेत आणि त्यांचे वय 20 वर्षांच्या आसपास आहे.

80 लोकांनी ठेवली पाळत

गुप्त मोहिमेंतर्गत आयएस दहशतवाद्याने दिल्लीनजीकच्या एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. प्रारंभी तो तेथील वसतीगृहात राहिला, परंतु नंतर त्याने दिल्लीतील एका भागात घर भाडय़ाने घेतले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक महिन्यापर्यंत दहशतवादी नजरेआड होऊ नये याकरता सुमारे 80 जणांना तैनात करण्यात आले होते.

अनेक ठिकाणांची रेकी

आयएस दहशतवाद्याने दिल्ली विमानतळ, मॉल्स, बाजारांची रेकी करून अनेक ठिकाणांची संभाव्य दहशतवादी हल्ल्यांसाठी निवड केली होती. दहशतवाद्यांच्या या नेटवर्कद्वारे विविध देशांमध्ये 12 ठिकाणी स्फोट घडविले जाणार होते. 22 मे 2017 रोजी मँचेस्टर हल्ला देखील त्यांच्याच गटाने घडवून आणला होता. दुबई येथून अफगाणिस्तानात या दहशतवाद्यांकडून 50 हजार डॉलर्सची संशयास्पद देवाणघेवाण झाली होती.

Related posts: